ग्रामपंचायत घोटी बुद्रुक अंतर्गत स्वच्छता मोहिमेला गती देण्यासाठी संक्शन मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे मशीन सार्वजनिक ठिकाणांवर व नाल्यांमध्ये संकलित सांडपाण्याचे प्रभावीपणे शोषण व विल्हेवाट लावण्याचे कार्य करते. या उपक्रमामुळे स्वच्छता व आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ झाली आहे.
स्मार्ट TV
ग्रामपंचायत घोटी बु. अंतर्गत १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून झेड.पी. शाळांमध्ये स्मार्ट टीव्हीचे वाटप करण्यात आले आहे. या डिजिटल शिक्षण सुविधेमुळे विद्यार्थ्यांना व्हिज्युअल शिक्षणाचा लाभ होत असून, शिक्षण अधिक प्रभावी व रुचीपूर्ण झाले आहे.
सौर उर्जा
ग्रामपंचायत कार्यालय व झेड.पी. शाळांमध्ये सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे वीजबचत होत असून पर्यावरणपूरक उपाययोजनांसाठी घोटी बु. हे गाव आदर्श ठरत आहे.
ग्रामपालिकेचे शॉपिंग सेंटर
ग्रामपंचायत घोटी बुद्रुक मार्फत २०२ व्यापारी गाळ्यांचे शॉपिंग सेंटर उभारण्यात आले आहे. हे शॉपिंग सेंटर लोकसहभागातून बांधण्यात आले असून, लिलाव पद्धतीने व्यवसायिकांना उपलब्ध करून दिले गेले आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीस लागले आहे.
अमरधाम
ग्रामपंचायत घोटी बु. अंतर्गत अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज अमरधाम उभारण्यात आले असून ग्रामस्थांसाठी मोफत वैकुंठ रथ व जळाऊ सरपणची व्यवस्था केली जाते. यासोबतच मुस्लिम व रावळ समाजासाठी अंत्यविधी अर्थसहाय्य दिले जाते.
फवारणी ट्रक्टर
ग्रामपंचायत घोटी बुद्रुक मध्ये सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व कीटकनाशक फवारणीसाठी फवारणी ट्रॅक्टरची सुविधा पुरवली आहे. या आधुनिक यंत्रामुळे कीड नियंत्रण, स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यात मदत झाली आहे.