ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
ग्रामपंचायत माहिती
घोटी बुद्रुक गावाला सामाजिक,आध्यात्मिक,राजकीय,शैक्षणिक व क्रांतीकारी गांव म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखल जाते. प्रगतीच्या अनेक पाऊल खूणा सोडत गगनाला गवसणी घालणारी प्रगती ह्या गावाने केली आहे. तरीही ऐतिहासिक वारसा ह्या गावाने जपला आहे. घोटी बुद्रुक हे गाव मुंबई -आग्रा महामार्ग लगत वसलेले असून घोटी गाव औद्योगिक दृष्ट्या प्रगतीपथावर असून गावामध्ये भातावर प्रक्रिया करून तांदूळ व मुरमुरा निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असते. तांदळाची निर्मिती करणाऱ्या राईस मिल मोठ्या प्रमाणात उभारलेल्या असून त्यांच्या द्वारे तांदळाचे उत्पादन करण्यात येते आहे. सदर तांदूळ हा महाराष्ट्रातल्या काना -कोपऱ्यात व्यावसायिकांमार्फत मोठ्या प्रमाणात व्यापार होत आहे. घोटी गाव हे मोठी बाजार पेठ असून शनिवार आठवडे बाजारा निमित्त लगतचे ठाणे, नगर, या अन्य जिल्ह्यातील व्यापारी गावात व्यापारा निमित्त मोठ्या प्रमाणात येत असतात. घोटी गाव हे दारणा तिरावर वसलेले असून गावा लगत भाम , वाकी खापरी, भावली कवडदरा , दारणा , वैतरणा मुकणे असे ७ धरणे व त्रिंगळवाडी, कांचनगाव, वाडीवऱ्हे, खेड येथे बंधारे उभारण्यात आलेले आहे. सदर धरणाचे पाणी दारणा धरणा द्वारे छत्रपती संभाजी नगर व मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येते असतो. घोटी गावालगत त्रिंगलवाडी, कावनई, कुरुंगवाडी, आवणपट्टा हे एतिहासिक शिवकालीन किल्ले आहेत. त्यामुळे घोटी गाव पर्यटनासाठी महत्वाचे ठिकाण आहे.
घोटी बुद्रुक २०११ च्या जनगणनेचा तपशील
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| तपशील | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा” गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आलाराष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!लोकसंख्या आकडेवारी लोकसंख्या आकडेवारी (2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||